नेवासा – राज्यात पुढील पाच दिवस निरभ्र आकाशासह किमान तापमान कायम राहून मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे. तसेच पहाटेचा गारठा कमी होऊन दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे.

राज्यात मागील २४ तासात काही जिल्ह्यात दिवसाचे तापमान वाढतांना दिसत आहे. इराण आणि लगतच्या भागात पश्चिमी चक्रावात निर्माण झाले आहेत. त्यामुळे उत्तर आणि पश्चिम भागात वाऱ्यांच्या प्रवाहात भिन्नता
दिसत आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या तुरळक भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे.

तर मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी दिवसा गारठा वाढण्याची शक्यता असून हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओरीसात धुक्याची शक्यता असून महाराष्ट्रात तापमान वाढ होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात आगामी काळात रात्रीच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. सध्या दिवसा कडक उन्ह, तर रात्रीचे किमान तापमान कमी असल्याने किंचित थंडी जाणवत आहे. मात्र, ही थंडी देखील आता कमी होणार आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.