नेवासा – राज्याचे मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंञी एकनाथराव शिंदे यांचा एकसष्ठवा वाढदिवस आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार (दि.९) रोजी सकाळी १० वाजता कुकाणा (ता.नेवासा) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन राज्याचे उप – मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचा अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. उपमुख्यमंञी एकनाथराव शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून कुकाणा (ता.नेवासा) येथे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यावेळी राबविण्यात आले तसेच उपमुख्यमंञी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील म्हणाले की,नेवासा तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सरकारच्या माध्यमातून विविध योजना तसेच समाजाच्या महत्वाच्या प्रश्नासाठी आपण निवडून दिलेल्या आमदारकीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी करणार असल्याचे यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,आपण गोरगरीब जनतेचे काम करून सर्वसामान्य जनतेला आधार देणार असल्याचे सांगून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना अभिप्रेत असलेले कार्य करुन तालुक्यात मोठे विकासात्मक कामे करुन तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंञी शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी कुकाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमात आमदार लंघे – पाटील बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक शिवसेनानेते प्रभाकर (काका) शिंदे होते आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील व शिवसेनानेते प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी अभियान तसेच मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कुकाण्याचे उपसरपंच सोमनाथ कचरे,अंतरवालीचे माजी उपसरपंच रवींद्र ओहळ यांच्यासह तीस पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी जिल्हासंपर्क बाळासाहेब पवार भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे,प्रताप चिंधे, तालुका प्रमुख सुरेश डिके,संजय पवार,महिला आघाडी तालुका प्रमुख शोभाताई अलवणे,राष्ट्रीय कर्मचारी शिवसेना केंद्रीय उपाध्यक्ष पुष्पा येळवंडे,नेवासा विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ,प्रकाश निपूंगे, बाप्पुसाहेब दरकुंडे,अजय दौले,बंडू शिंदे,आंबदास रोडे.
प्रदीप ढोकणे,सतीश कर्डीले,नवनाथ साळुंके, संजय खरे, शन्करराव भारस्कर,किरण जाधव,विनोद ढोकणे सरपंच अशोक टेकणे,मछिंद्र कावरे कचरू भाऊ सानप,रामेश्वर शिंदे,विश्वासराव काळे,स्वप्नील मोटे,प्रमोद गजभार,विलासराव देशमुख,मछिंद्र मुंगसे,विठ्ठल काळे,निलेश कोकरे
आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (काका) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथराव शिंदे यांचा अभिष्ठचिंतन सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.