ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पाणी

नेवासा – जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे जीबीएस (गुलेन बॅरी सिंड्राम) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जीबीएसच्या फैलावास दूषित पाणी कारणीभूत असून नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात दूषित पाणी नमुन्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना
पत्र पाठवून ग्रामीण भागात पिण्याचे पाणी दूषित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ३१ गावांतील पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पिण्याचे पाणी शुद्धीकरण व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या टीसीएल पावडर साठा उपलब्ध करणे, त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.

पाणी

याबाबत संबंधित गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या पातळीवरून सनियंत्रण केले जात आहे. मात्र अनेक गावात पाणी शुद्धीकरणात त्रुटी असल्याचे समोर येत आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईची शक्यता आहे. त्यासोबत उपलब्ध होणारे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच पुण्यासह राज्यातील काही भागात जीबीएस या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आंजाराने डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी राज्य सरकार पातळीवरून सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आता ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी दूषित होणार याबाबत आरोग्य विभाग काळजी घेतांना दिसत आहे.

पाणी

दरम्यान नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ३१ गावातील पाणी नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. याबाबत अहवाल जानेवारी महिन्यात तयार ‘झाला असून आरोग्य विभागाने संबंधित गावांसह गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवत अवगत केले आहे. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात १२ गावातील पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये (टीसीएल) २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ही पावडर पाणी शुध्दीकरणासाठी कुचकामी ठरणार आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून संबंधीत ग्रामपंचायत आणि त्यात्या पंचायत समितीला कळवण्यात आले आहेत.. तसेच पाणी नमुने दूषित असणाऱ्या ३१ गावांना तातडीने सुधारणा करण्यास सांगण्यात आले आहे.

पाणी

जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या १ हजार ७३५ गावांपैकी ३१ गावातील आणि नमुने दूषित आढळून आले आहेत. यात अकोले ५, कोपरगाव ३ नगर ८, नेवासा १, पारनेर १, पाथर्डी २, राहाता ३, राहुरी २, संगमनेर ४, शेवगाव २, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर प्रत्येकी १ या गावांचा समावेश आहे.

पाणी दूषित असणारी गावे

चंदगरवाडी, निब्रळ, लव्हाळीओतूर, सातेवाडी (अकोला). वेळापूर, मुर्शतपुर, रांजणगाव, देशमुख (कोपरगाव). रतडगाव, नागरदेवळे, कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, अकोळनेर, पिंपळगाव माळवी (नगर). कौठा (नेवासा), धोत्रे खु. (पारनेर). कोल्हार, लांडकवाडी

newasa news online
पाणी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!