नेवासा – दिल्लीत भाजपाचे सरकार आले असून भाजपने विधानसभा निवडणुकीत जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दिल्लीतील लाडक्या बहिणींना आता प्रतीमहिना अडीच हजार रुपये मिळणार आहेत. आपने दिल्लीतील महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरू केली होती, या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये दिले जात होते.
दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आलं असल्याने आता ही जुनी योजना बंद होण्याची शक्यता आहे. नव्या योजनेंतर्गत दिल्लीतील महिलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत.

भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळीच या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचं सरकार आल्यानं नवी योजना कधीपासून सुरू होणारत्यासाठी अर्ज कसा करायचा याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.
मार्चपासून ही नवी योजना सुरू अ होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरराष्ट्रीय महिलां दिनापूर्वी दिल्लीतील महिलांच्या खात्यात दर महिन्याला अडीच हजार रुपये जामा होण्यास सुरुवात होईल असे म्हटले होते. त्यामुळे आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, येत्या मार्चपासून दिल्लीतील महिलांच्या खात्यात. दर महिन्याला अडीच हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतरच या योजनेबाबतचं अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.