नेवासा – हद्दपार आदेशाचा भंग करून जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या शिर्डी व अहिल्यानगर मधील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशाल मायकल मोकळ (रा. आंबेडकरनगर, राहाता), सागर भाऊसाहेब गायकवाड (रा. नवीन बाजारतळ, बिरोबा रस्ता, शिर्डी) व सलमान मेहबुब खान (रा. कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर) अशी जेरबंद केलेल्या तिघांची नावे आहेत.
त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत शिर्डी व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले तीन सराईत गुन्हेगार शिर्डी व अहिल्यानगरमध्ये अवैधरीत्या वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, पालीस आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, मनोहर गोसावी, हृदय घोडके, संदीप दरंदले, रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, अरूण मोरे व महादेव भांड यांच्या पथकांनी शिडी व अहिल्यानगर परिसरात शोधमोहीम राबवून तिघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील, असे अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.