नेवासा – शहरातील दुकानासमोर हातगाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणी दुसऱ्या बाजूकडूनही फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समिर खॉजा बागवान (वय २३) व्यवसाय – फळ विक्री दुकान, रा. लक्ष्मीनगर, नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी नेवासा खुर्द गावातील गणपती चौकाजवळील अल्पना केकजवळ माझी फळ विक्रीची हातगाडी लावत असतो. या ठिकाणाजवळ इम्रान आतायुल्ला पठाण याची बंद असलेली ट्रान्सपोर्ट टपरी आहे.

८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास मी फळ विक्रीसाठी हातगाडी लावत असलेल्या ठिकाणी इम्रान आतायुल्ला पठाण हा आला व मला म्हणाला की, तू येथे हातगाडी का लावतो? असे म्हणून मला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी मी त्यास हातगाडी काढून घेतो असे म्हणालो असता त्याचा त्यास राग येवून इम्रान याने जुम्माखान नबाबखान पठाण, वाजीद जुम्माखान पठाण, अब्रार रहमतुल्ला पठाण, तोसिफ तौफिक पठाण, फैसल बरकत पठाण सर्व रा. नेवासा खुर्द यांना बोलावून घेतले. त्यावेळी इम्रान आतायुल्ला पठाण याचे हातात लाकडी दांडा होता व जुम्माखान नबाबखान पठाण यांच्या हातात लोखंडी गज होता. त्यानंतर जुम्माखान पठाण याने मला हातगाडीवरून खाली ओढले व त्याच्या हातातील लोखंडी गजाने पाठीवर मारले व इम्रान याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने माझ्या डोक्यात मारले व संर्वांनी लाथाबुक्क्याने मारहाण करूंन शिवीगाळ केली.

त्यावेळी आरडाओरड ऐकून अल्ताफ पठाण, सुलेमान मनियार हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्या सर्वांनी मला जिवे मारण्याची धमकी देवून ते सर्व जण निघून गेले. त्यानंतर मला वसीम गनी बागवान, दाऊत इस्माईल बागवान यांनी सरकारी दवाखाना, ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे माझ्यावर उपचार करण्यात आले. आज मला बरे वाटत असल्याने मी पोलीस स्टेशनला आलो. या फिर्यादीवरून इम्रान आतायुल्ला पठाण, जुम्माखान नबाबखान पठाण, वाजीद जुम्माखान पठाण, अनार रहमतुल्ला पठाण, तोसिंफ तौफिक पठाण व फैसल बरकत पठाण, सर्व रा. नेवासा खुर्द यांच्यावर मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ह्वालदार सुधाकर दराडे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.