सोनई –पांढरी पुल घाट व परिसरात वारंवार अपघात होत असून अपघातांची ही मालिका संपण्याचे नाव घेत नाहीये. या अपघातांमध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे तर काहींना आपला जीव हकनाक गमवावा लागत असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. परिसरातील नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पांढरीपुल परिसरातील विविध गावांच्या ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाची हाक देत अहिल्यानगर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

या उपोषणामध्ये वांजोळी येथील सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, सरपंच अप्पासाहेब खंडागळे, खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हारेर, झापवाडीचे सरपंच माऊली जरे, चेअरमन श्रीराम काळे, माजी सरपंच शशिकांत वाघ, सोनईचे माजी सरपंच हरीभाऊ दरंदले, जेऊरचे माजी सरपंच अण्णासाहेब ससे, डोंगरगणचे माजी सरपंच कैलास पटारे, बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेल्हेकर, तुकाई शिंगवेचे सरपंच सतिश थोरात, जालिंदर ढेरे, इमामापूरचे सरपंच भिमाजी मोकाटे, रावसाहेब काळे, प्रल्हाद भिसे, बाबाभाई शेख, आबासाहेब लोखंडे आदींना सहभाग घेतला.
यावेळी आंदोलकांनी घाटामध्ये तीव्र उतारास अवजड वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण राहण्यासाठी गतिरोधक तयार करणे, सोनई आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीवर लोखंडी बॅरिगेट लावून चेक पोस्ट उभारणे, सूचनाफलक व मार्गदर्शक फलक लावणे, सिग्नल लाईट बसवणे तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करणे आणि घाटामधील रस्त्यांवर रिफ्लेक्टर लावण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.चव्हाण यांनी आमच्याशी चर्चा करत शुक्रवारपर्यंत याबाबत उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन सायंकाळी उशीरा दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले असून उपाययोजना न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा करण्यात येईल
– बद्रीनाथ खंडागळे, चेअरमन, वांजोळी


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.