नेवासा – भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात भगवान विश्वकर्मा जयंती एकता उत्सव समिती नेवासा शहराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरपंचायत चौकात भगवान विश्वकर्मा प्रतिमेचे पंचगंगा सिड्स चे प्रभाकर काका शिंदे शिवसेनेचे बाळासाहेब पवार समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करणसिंह घुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. सर्व कारागिरांचे निर्माण क्षेत्रातील लोकांचे ते आराध्य दैवत आहे.
अनेक क्षेत्रातील कारागिरांचे कौशल्याचे अधिष्ठान भगवान विश्वकर्मा आहेत, असे उद्गागार प्रभाकर काका शिंदे यांनी केले.

कौशल्याधिष्ठित अनेक व्यवसाय आहेत जसे की टेलरिंग, गवंडी काम, सुतार काम, कुंभारकाम, केशकर्ताना चे काम, चामड्याच्या चपला व वस्तू बनवण्याचे काम, हस्तशिल्पी इत्यादी लोकांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नगरपंचायत स्तरावर राबवण्यात येते. या योजनेत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी एक सहाय्यता केंद्र नजीकच्या काळात चालवण्यात येईल आणि सर्वांना त्याच्या माध्यमातून मदत करण्यात येईल असे आश्वासन समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांनी जमलेले कारागीर कामगार यांना दिले.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक अनिल सोनवणे नवनाथ आगळे दत्तात्रय आगळे गणेश परदेशी संतोष भागवत गणेश शिर्के राजू आगळे सुरेश सोनवणे यांनी आलेल्या पाहुण्याच्या सत्कार केला. तसेच पप्पू परदेशी राकेश सोनवणे डेव्हिड साळवे राजू वडागळे मिलिंद नागे प्रकाश चव्हाण गणपत मोरे अनिल ताके रोहिदास शेंडे हिरामण गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभार विकास चव्हाण यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.