नेवासा – केंद्र सरकारच्या परिवहन व रस्ते वाहतूक विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार १५ वर्षे जुन्या वाहनांच्या पुननोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. देशातील १५ वर्षे जुन्या सर्व रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक यांसह सर्वसामान्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुनर्नोदणीच्या शुल्कात वाढ झाली असून ८ हजारांच्या पुननोंदणी शुल्कासाठी आता १२ ते १८ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या शुल्कवाढीला महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेद्वारे तीव्र विरोध करण्यात आला आहे.

कित्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात वैयक्तिक कामांपासून ते व्यावसायिक कामांपर्यंत वाहनांचा वापर करतात. देशातील वाहतूकदारांवर विविध प्रकारचे कर लावलेले आहेत आणि अशातच केंद्र सरकारच्या परिवहन व रस्ते वाहतूक विभागाने नवा जीआर काढल्याचे वृत्त समोर आले आहे. शासनाने वाहनांच्या पुननोंदणी शुल्कासंदर्भात एक नवा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार, जुन्या वाहनांच्या पुननौदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या जीआरमध्ये १५ वर्षे जुन्या वाहनांच्या पुननोंदणीसाठी १२ ते १८ हजार रुपये भरावे लागणार असल्याचे नमूद केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.