नेवासा – दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये चालणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांची गंभीर – दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, – पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक – कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सामूहिक कॉपी आढळल्यास अशा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी. – तसेच विद्यार्थ्यांना कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत. राज्यात मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या. परीक्षेत चालणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

या परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत चर्चा करतानाच परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवावा. विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगण्यास मनाई करावी. भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे. संवेदनशील केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवावी. जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावी. प्रत्येक तालुक्यात विशेष प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले.

दहावी, बारावी परीक्षा कालावधीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.