परिसरातील ग्रामस्थांच्या रेट्यामुळे अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने होणार उपाययोजना.
सोनई –पांढरीचा पूल घाटात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे व होणाऱ्या जीवित हानी विरोधात
पांढरीचा पुल,वांजोळी,खोसपुरी, शिंगवेतुकाई, मजले चिंचोली येथील नागरिक आक्रमक झालेले असून सोम दि 10 फेब्रु 2025 रोजी अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाहेर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले व तातडीनेउपाययोजना करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.झालेली जीवित हानी व नागरिकांमध्ये असलेला असंतोष यामुळे शुक्र दि 14 फेब्रु 2025 पर्यत सदर जागेवर उपाययोजना करण्याचे लेखी अश्वासन उपस्थित उपोषणकर्ते यांना बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल
चव्हाण यांनी दिले.

त्यानुसार मंगळ दि 11 फेब्रु रोजी वांजोळीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे,खोसपुरीचे मा सरपंच सोमनाथ हारेर,सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभय भांगे उपकार्यकारी यांचेसह पाहणी केलीbअपघात होणाऱ्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे भांगे यांनी सांगितले. अपघातग्रस्त जागेवर परिसरातील नागरिकांच्या रेट्यामुळे उपाययोजना होणार असल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत..

कायमस्वरूपी अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने
वेळोवेळी दिलेल्या रेट्यामुळे होणार असुन यामुळे पांढरीचा पुल येथील व्यवसाय बहरनार आहे व जीवत हानी टळणार आहे.
– बद्रीनाथ खंडागळे, चेअरमन वांजोळी


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.