सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्यावर मंगळ दि 11 फेब्रु 2025 रोजी कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. मुळा कारखाना व सार्वजनिक आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शिबिरामध्ये ऊस तोडणी कामगाराची आरोग्य तपासणी करण्यात आली याप्रसंगी डॉ संतोष विधाते यांनी आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेतली जावी याबाबत त्यांनी ऊस तोडणी कामगारा बरोबर चर्चा केली

त्याचप्रमाणे डॉ राजू बर्डे यांनी ऊस तोडणी कामगारांना क्षयरोग (टी.बी.) या आजाराबाबत माहिती देण्यात आली व या आजाराला कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे याबाबत त्यांनी माहिती दिली. व आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांचे त्यांनी चेकअप केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले यांनी आलेल्या सर्व आरोग्य विभागाचे डॉ व त्यांचे सहकारी यांचा कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी उपस्थित डॉ संतोष विधाते वैद्यकीय अधिकारी सोनई, पत्रकार विनायक दरंदले ,डॉ सुनील वाघ समुदाय आरोग्य अधिकारी शिंगणापूर, डॉ रमेश जावळे डॉ देविदास नवले , शेतकी अधिकारी विजय फाटके,मुळा कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार ,सरचिटणीस डी एम निमसे , योगेश घावटे, दिनेश जंगले यावेळी उपस्थित होते शेवटी दत्ता सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.