गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कौठा येथील हाॅटेल मध्ये सुरू असलेल्या बेकायदा दारू वरती सोनई पोलीसांनी कारवाई केली.दि. १२ रोजी कौठा ते कुकाणा रोडवरील हाॅटेल जगदंबा येथे बेकायदा दारू विक्री होत असल्याचे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर, पोलीस नाईक बाळासाहेब तागड,पोलीस काॅस्टेबल ज्ञानेश्वर आघाव, चालक पोलीस काॅस्टेबल सुभाष बोरुडे यांचे पथक तयार करुन तेथे सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीवर छापा टाकत कारवाई केली.

कारवाई दरम्यान १२,९१५ रुपये किंमत असलेली विविध देशी विदेशी कंपन्यांची दारू या पथकाने जप्त करत आरोपी अमोल रामभाऊ आगळे (वय.३०) यास ताब्यात घेतले. पोलीस काॅस्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ३९/२०२५ महाराष्ट्र दारू कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.