नेवासा – पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ.नगर जिल्हा कार्याध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील रहवासी असलेले अॅड. बाबासाहेब ब्राम्हणे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी ब्राम्हणे यांना नियुक्तीपञ देवून ही निवड केली आहे. नगर जिल्ह्यात प्रा.जोंगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्य तळागाळात निर्माण करुन आंबेडकरी चळवळीला उभारी देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अ.नगर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.बाबासाहेब ब्राम्हणे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल आसाराम गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,रोहित ब्राम्हणे,मनोज झगरे,विजय गव्हाणे,विठ्ठल जाधव,नारायण पाटील,शामराव सोनकांबळे,मधूकर पावसे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.