ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १९ महिन्यांतील थकीत फरक अदा होणार
नेवासा – जानेवारी, २०२५ व त्या पुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे १९ महिन्यांतील किमान वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये ३४६ कोटी २६ लाख ८ हजार इतका निधी वितरीत व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील गावकारभाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सरपंच, उपसरपंच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मागणीनुसार ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतूद रु.६०९:४२ कोटी इतका निधी मंजूर केला आहे. तद्नंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दि.१ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२२ पर्यंतची सुधारित किमान वेतनातील थकबाकी अदा करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात ४०० कोर्टीची पुरवणी मागणी मंजूर केली.

तसेच सरपंच व उपसरंपच यांच्या मानधनात शासन निर्णय दि. २४ सप्टेंबर २०२४ अन्वये वाढ करण्यात आल्याने, हिवाळी अधिवेशनात रु.१२८.२४ कोटींची पुरवणी मागणी मंजूर केली आहे. त्यानुसार सन २०२४-२५ साठी एकूण रु.११३७.६६ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी वित्त विभागाने आतापर्यंत रु.६५०,९७,०८,०००/- इतका निधी बीडीएस वर उपलब्ध करुन दिला आहे.आता वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीतील शिल्लक तसेच पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीमधील अवितरीत निधीतून जानेवारी, २०२५ व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ‘तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे १९ महिन्यांतील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये तीनशे सेहचाळीस कोटी सहवीस लाख आठ हजार फक्त इतका वितरीत केला आहे.

सदर सहायक अनुदान अदा करण्यासाठी विकसित केलेल्या इआरपी प्रणाली सद्यःस्थितीत बंद असल्याने, सदर प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत होईपर्यंत सहायक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरीत करुन, जिल्हा परिषदेमार्फत संबंधितांना अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रयोजनार्थ निधी वितरीत करण्यात आला आहे, त्या प्रयोजनार्थ खर्च करावा. प्रथमताः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता अदा करुन झाल्यानंतर उर्वरित उपलब्ध रक्कमेतून ग्रामपंचायत ‘कर्मचारी यांचे १९ महिन्यांचे किमान वेतनातील फरक अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.