ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
ग्रेस गुण

नेवासा – इयत्ता १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना स्पर्धेतील सहभाग व प्राविण्यानुसार दिले जाणारे ग्रेस गुण अर्ज यावर्षीपासून (२०२४-२५) शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे केवळ ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांमार्फत पार पडत होती. मात्र, काही मानवी त्रुटींमुळे अर्ज सादर करण्यास विलंब होत असे किंवा काही विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण होत असे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

ग्रेस गुण

ऑफलाईन पद्धतीवर प्रभावी उपाययोजना म्हणून २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून पूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले सरकार अॅप अथवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज ऑनलाइन भरावा. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण ऑनलाईन मिळणार

स्तरावरील खेळ स्पर्धामधील सहभाग किंवा प्रावीण्य यासाठी सवलत गुण अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच सादर करावा. अर्जाची प्रत आपले सरकार पोर्टलद्वारे सर्वप्रथम जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास पोहोचेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा शाळांनी प्रत्यक्षपणे अर्ज सादर करू नये. आपले सरकार पोर्टल, अॅपवर लॉगिन करून अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच सदरच्या अर्जामध्ये खेळ व प्रमाणपत्रांची माहिती अपलोड करावी. अर्जाची स्थिती पोर्टलवर नियमित तपासणे याबाबतची नोंद शाळा व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी घ्यावी. सर्व संबंधितांनी प्रक्रियेनुसारच अर्ज भरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ग्रेस गुण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रेस गुण
ग्रेस गुण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रेस गुण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!