नेवासा – नेवासा शहर येथील श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराच्या वतीने श्री मोहिनीराज मंदिरावर लावण्यात येणाऱ्या मानाच्या पहिल्या झेंड्याचे पूजन श्री उद्धव महाराज मंडलिक, सुनीलगिरी महाराज व ऋषिनाथ महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. झेंडा मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी श्री सिद्धेश्वर मंदिराचे महंत ब्रम्हलिन श्री बालब्रम्हचारीजी महाराज ‘यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कुटे पाटील यांच्या निवासस्थानी उद्धव महाराज मंडलिक, सुनीलगिरी महांराज, ऋषिनाथजी महाराज, देविदास महाराज म्हस्के यांचे पूजन संजय कुटे व छायाताई कुटे, सत्यवान कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत आरती करण्यात येऊन झेंडा मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. नेवासा बुद्रुक ते नेवासा शहर अशी झेंडा मिरवणूक काढण्यात आली. या झेंडा मिरवणुकीचे नेवासा बुद्रुकसह नेवासा शहरात विविध संघटनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संभाजी ठाणगे, अनिल ताके, बालू फसले, विलास कुटे, राजेंद्र कुटे, शेषराव कुटे,डॉ. मोहन कुटे, सत्यवान कुटे, अॅड. संदीप कुटे, अशोक कुटे, किरण कुटे, अतुल कुटे, तुषार कुटे, संतोष कुटे, राहुल कुटे, आलोक कुटे, दिलीप गायकवाड, राजेंद्र थावरे, अशोक टेमकर उपस्थित होते.
मिरवणूक मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणात आल्यावर यात्रा कमिटी व देवस्थानच्यावतीने श्रीफळ प्रसाद देऊन झेंडा मानकरी कुटे परीवाराचा सन्मान करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.