नेवासा – भगवान श्री विष्णूंचे मोहिनी अवताराचे जगातील एकमेव क्षेत्र असलेल्या नेवासेनगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने “मोहिनीमाय, मोहिनीमाय,मी अपराधी घ्या पदरात” व आई जगदंबेचा जयघोष करत लखलखत्या अग्नीच्या खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक “भळंद” कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.”भळंद” कार्यक्रमाला नेवासेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या उत्सवामुळे तीर्थक्षेत्र नेवासेनगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.माघ शुध्द पोर्णिमेस गावातील सर्व कुटुंबातून कुलधर्म कुंलाचार केला जातो.यावेळी ग्रामदैवताला पूृरणपोळीचा नैवेद्य ही दाखविला जातो.

माघ पोर्णिमेच्या बुधवारी रात्री मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात संबळाच्या निनादात गोंधळ घालीत “भळंद”खेळत देवतेला यात्रा उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.यावेळी नजीक चिंचोली येथील दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादात देवीची भक्ती गीते गायली त्यांना राजेंद्र परदेशी,निखिल जोशी सुभाष चव्हाण यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली. “भळंद” कार्यक्रम प्रसंगी मांडलेल्या देवीच्या चौरंगावर गणेशपूजन, पुण्याहवाचन करून जगदंबेला
भालचंद्र प्रभाकर बडवे व सौ.रेखा बडवे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.यावेळी देवीचा जागर करीत आदिनाथ जोशी व सौ.आदिती जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात “भळंद” सादर केला.

रेणुकादेवी आश्रमाचे आर्यन जोशी,विकास पोहेकर,सौ. रेणुका जोशी,सौ.वर्षा पोहेकर,मंगेश भालेराव,सिध्दांत भालेराव यांनी झांज टाळवाद्य व गायन करत साथ केली. भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली. बोल “मोहिनीराज महाराज की जय”बोल मोहिनीराज की जय”असा जयघोष यावेळी करण्यात आला. झालेल्या “भळंद”कार्यक्रमाचे पौरोहित्य अरुण जोशी, पांडूगुरू जोशी,निखिल जोशी, ओंकार जोशी, अंकुश जोशी यांनी केले. गुरुवारी पहाटे तहसीलदार संजय बिरादार यांच्या हस्ते श्री मोहिनीराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला. तदनंतर सकाळी मानाचा झेंडा मंदिरावर चढविण्यात आला.दुपारी ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या उत्सव मूर्तीचे पाच दिवसांसाठी पाकशाळेकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.पाकशाळा येथे पाच दिवस उत्सव मूर्ती ग्रामस्थांना दर्शनासाठी ठेवण्यात येते.तर ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

भगवान श्री मोहिनीराज यात्रा कमेटीच्या वतीने मोहिनीराज मंदिर ते जुनी सेंट्रल बँक पर्यंत भळद पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आली होती.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.