वार्षिक स्नेहसंमेलनाचा गडाख कुटुंबीयांनी लूटला आनंद !
नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानदीप विद्यालयात ‘यशोरंग’ हा विविध गुणदर्शन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे सीआरपीएफचे कमांडंट मा. विशाल विजय एरंडे, डॉ. निवेदिता गडाख, संस्थेचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाचे प्राचार्य श्री. वैभव आढाव यांनी वार्षिक अहवाल वाचनात विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा व राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘ध्येय हे एकनिष्ठ असावे तसेच ध्येयाकडे विचारपूर्वक वाटचाल व्हावी त्याचप्रमाणे देश सेवा ही आपण ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या क्षेत्रातूनही करता येते’ ही भावना व्यक्त केली. डॉ. विनायक देशमुख यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. डॉ. निवेदिता गडाख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, यश अकॅडमी सोनई चे प्राचार्य श्री. अजहर गोलंदाज, मुळा पब्लिक स्कूल सोनई चे प्राचार्य श्री. बाबासाहेब मुसमाडे तसेच पालक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले..


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.