ग्रामस्थान्सह शासकीय कर्मचारी तणावाखाली
नेवासा – लोखंडी पहार हातात घेऊन ग्रामस्थान्सह शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तीच्या दहशतीने मक्तापूर मधील ग्रामस्थांना पुरते ग्रासले आहे. या मनोरुग्णाच्या भीतीने आरोग्य, शिक्षण, विभागातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना दडपणाखाली जगण्याची वेळ ओढवल्यामुळे आता याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे. याबाबत मक्तापूर ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, मक्तापूर गावात अंगणवाडी ते दहावी पर्यंत शिक्षणाची सोय असून गावात आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांचा कायम राबता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावातीलच एका मनोरुग्ण व्यक्तीने हातातील लोखंडी पहार सदृश्य वस्तुच्या सहाय्याने ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अक्षरशः वेठीस धरल्याचा ग्रामस्थ्यांचा आरोप आहे.

विमनस्क अवस्थेतील हा मनोरुग्ण गावात दिसेल त्याला हातातील पहारीने हल्ला करण्याचा तसेच धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले आहे. ग्रामस्थ तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे या मनोरुग्णाकडून कोणाला प्रत्यक्ष दुखापत अथवा धोका निर्माण झाला नसला तरी एखाद्या बेसावध क्षणी त्याच्याकडून हल्ला झाल्यास जीवावर बेतू शकते या संभाव्य धोक्याच्या भीतीने ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना पुरते ग्रासले आहे.

यासंदर्भात मक्तापूर ग्रामस्थांनी नेवासा पोलिसांना कळवून या मनोरुग्णचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्याचे त्यांचे म्हणणे असून मात्र पोलिसांनी यासंदर्भात ठोस कारवाई करून दिलासा देण्याऐवजी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांवरच जबाबदारी टाकून हात झटकल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे या मनोरुग्णचा उपद्रव सुरूच असून त्याच्या भीतीने ग्रामस्थ्यांना त्यांच्या मुला मुलींना मोठ्या मानसिक दडपनाखाली शाळेत पाठवावे लागत आहे. तसेच शासकीय लोकसेवकांना देखील मानसिक तणावाच्या स्थितीत सेवा देण्याची वेळ ओढवल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या मानसिक तणावामुळे विद्यार्थी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत दुष्परिणाम होत असल्याने या मनोरुग्णचा नियमानुसार यथोचित बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी असून अन्यथा तीव्र आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करण्याच्या मानसिकतेत ग्रामस्थ आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.