नेवासा – ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या महाआरती सोहळयाला संत महंतांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती. महाकुंभच्या पर्वकाळात झालेल्या महाआरतीने हजारो भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण यावेळी अनुभवला.”गंगा गोदावरी माता की जय” “अमृतवाहिनी प्रवरामाता की जय” च्या गजराने येथील परिसर दुमदूमला होता. तर यावेळी झालेल्या दिपोत्सवाने प्रवरामाई उजळून निघाली होती.नेवासा येथील गणपती घाटावर श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी प्रवरामाईचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. तसेच आकर्षक भव्य विद्युत रोषणाई ही सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आली होती.

गुरुवारी सायंकाळी झालेला अमृतवाहिनी प्रवरामाईचा महाआरतीचा सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. महाआरती सोहळयाच्या प्रसंगी उध्दवजी महाराज मंडलिक नेवासेकर, सुनीलगिरीजी महाराज, श्री ऋषिनाथजी महाराज, श्री ज्ञानेश्वरजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज हजारे, सचिन महाराज पवार, बालब्रम्हचारी श्री विश्वनाथजी महाराज यांच्या हस्ते प्रवरामाई चे पुजन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीत महाआरतीचा सोहळयाच्या प्रसंगी नाशिक येथील गंगा-गोदावरी पंचकोटी आरती समूहातील आचार्य वेदमूर्ती अतुल गायधनी,शेखर शुक्ल,चंद्रशेखर पंचाक्षरी, कल्पेश दीक्षित,अतुल पंचभय्ये,सदानंद देव,सौरभ गायधनी,अलोक गायधनी,सिद्धेश खांदवे,अमित पंचभाई, मोहक गायधनी,कल्पेश दीक्षित,नितीन पाराशरे या व गाम्रपूरोहित निखील जोशी, ऋषिकेश जोशी, मयुर जोशी,अभिजीत बडवे वेदमूर्ती पुरोहितांची गंगापूजन व आरती सोहळयाला प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना उध्दवजी महाराज म्हणाले की,भारत देशातील पवित्र तीर्थापैकी तसेच नद्या पैकी प्रवरामातेचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा असुन या नदीच्या तिरावर आपल्या जिल्ह्यातील प्रवरा मातेचा २०० ते २२५ किमी चा प्रवास असून अकोले, संगमनेर राहुरी, श्री क्षेत्र नेवासा वसलेले आहे. नेवासा नंतर या नदीच्या तीरावर श्री क्षेत्र देवगड हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे देवगड नंतर ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. इतिहासकारांच्या मतानुसार हजारो वर्षांपूर्वी वसलेल्या वस्ती पैकी नेवासा हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र या प्रवारा मातेचे नदीवर वसलेले आहे त्यामुळे नेवाशाला पुरातन असा इतिहास आहे.

या ठिकाणी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप केले या अवताराला म्हाळसा देखील म्हणतात या म्हाळसे वरूनच ऋषी वाणी यांनी आपल्या मुलीचे नाव म्हाळसा असे ठेवले म्हाळसा म्हणजे खंडोबाची सासरवाडी असे नेवासा हे पवित्र तीर्थक्षेत्र असून अनेक घटनांचा साक्षीदार राहिलेले आहे.महाआरती प्रसंगी “धर्म की जय हो,अधर्म का नाश हो,प्राणीयोमे समभावना हो,विश्व का कल्याण हो”,”हर हर महादेव,”गंगा गोदावरी माता की जय”,”अमृतवाहिनी प्रवरा माता की जय”असा जयघोष यावेळी करण्यात आला.महाआरती सोहळयास यात्रा कमिटीचे सदस्य महिला,पुरुष, युवक युवती बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.