नेवासा – श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे १ मार्च पासून शनीदेवाला अर्पण करण्यासाठी केवळ ब्रँडेड कंपनीचेच तेल वापरण्याच्या सूचना देवस्थान विश्वस्त मंडळाने व्यावसायिकांना दिल्या आहेत.
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय तसेच शनिशिंगणापूर ग्रामसभेच्या निर्णयानुसार श्री शनि देवाच्या स्वयंभू शिळेची संभाव्य झिज टाळण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) मान्यता प्राप्त खाद्यतेलच शनी मूर्तीवर अर्पण करण्याची परवानगी देण्याचे ठरले आहे.

त्यामुळे सर्व व्यावसायायिकांना विक्रीसाठी एफएसएसएआय मान्यता प्राप्त ब्रँडेडकंपनीचे खाद्यतेलच ठेवावे व अर्पण करण्यासाठी येणारे खाद्यतेलचे बॉटल, ड्रम, डबा इत्यादी पॅकिंगवर
एफएसएसएआय परवाना क्रमांक असावा अशा सांगितले आहे.याव्यतिरिक्त शनी मंदिरात आलेले
तेल न स्वीकारता मागे पाठविले जाईल, अशाप्रकारची नोटीस शनैश्वर देवस्थानच्या वतीने व्यावसायिकांना
देण्यात आलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.