संतांनी आपल्या कर्मामध्ये परमार्थ पाहिला – गणेश चौधरी महाराज
भेंडा – आजच्या समाजाला स्पर्धेच्या युगात विज्ञानाच्या आणि भौतिक आकर्षणाच्या गरजेमध्ये गुंतलेल्या मानवी जीवनाला विवेक संपन्नतेची गरज आहे आणि ही विवेक संपन्नता संत विचारांमधूनच आपल्याला मिळते.संतांनी आपल्या कर्मामध्येच परमार्थ पाहिला असल्याचे प्रतिपादन गणेश महाराज चौधरी यांनी केले. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे सुवर्णकार समाजाचे वतीने आयोजित संतश्री नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,त्यावेळी प्रवचन सेवेत गणेश महाराज बोलत होते.
प्रारंभी संतश्री नरहरी महाराज यांच्या
प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली.

गणेश महाराज चौधरी पुढे म्हणाले की, संतांच्या पुण्यतिथी साजरा करण्याचे मूळ कारण म्हणजे संतांच्या जीवन चरित्रातून आज आपल्याला जीवन जगण्यासाठी अनमोल असे संदेश व त्यांचे विचार अनुकरणात आणण्यासाठीचा प्रेरणादायी दिवस असतो. संतांचे जीवन आजही समाजाला आदर्शवत का आहे त्याचं कारण त्यांचे संबंध जीवन हे विवेक संपन्न आहे. आजच्या समाजाला स्पर्धेच्या युगात विज्ञानाच्या आणि भौतिक आकर्षणाच्या गरजेमध्ये गुंतलेल्या मानवी जीवनाला विवेक संपन्नतेची गरज आहे आणि ही विवेक संपन्नता संत विचारांमधूनच आपल्याला मिळते. म्हणून संतांच्या विचारांचा जागर करणे अत्यावश्यक आहे.
श्रीसंत नरहरी महाराज यांच्या जीवन चरित्रातून द्वैत भाव दूर करण्याचा संदेश आपल्याला मिळतो.

नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड,उपसरपंच – नामदेव शिंदे,सागर पंडित, अवधूत लोहकरे,अर्चना लोहकरे, माजी सरपंच – रोहिणी निकम,माजी उपसरपंच सिमा फुलारी,डॉ.कविता मुळे,गिता औटी, सुरेखा मंडलिक, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ लहानु मिसाळ,ॲड रवींद्र गव्हाणे, अशोक पंडित, महादेव पंडित, देविदास गव्हाणे, शिवाजी फुलारी, अशोक लोहकरे, विष्णू पंडित,डॉ.संतोष फुलारी, महेश पुंड, रंगनाथ गव्हाणे, अजित रसाळ, आबासाहेब काळे, सुभाष चौधरी, केशव पंडित, वामन औटी, आप्पासाहेब बोडखे, पोपट उगले, शरद गव्हाणे,
यावेळी उपस्थित होते.सागर पंडित व परिवाराच्या वतीने यांचे उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.