नेवासा – छावा हा केवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्रपट नसून तर तो जाज्वल्य इतिहासाची अनुभूती देणारा चित्रपट असून पहिल्या दिवसाचा शो पाहताना सिनेमा नाही तर साक्षात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत होत आहे असे जाणवते. त्यामुळे सदरचा चित्रपट हा महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने देखील टॅक्स फ्री करावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा -इतिहास- सबंध देशातील तरुण पिढीला बघता येईल. चित्रपट बघताना छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी केलेल्या लढाया यांमुळेच त्यांना धर्मरक्षक , स्वराज्य रक्षक का म्हणतात. याची अनुभूती येते त्यांनी केलेल्या लढाया व त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार पाहताना माणसं सुन्न होतात. चित्रपट सुरू झाल्यापासून विकी कौशल फक्त एक अभिनेता वाटत नाही तर ते छत्रपती संभाजी महाराज भासतात. त्यांची देहबोली चेहऱ्यावरचा करारी भाव डोळ्यातील रोष आणि रणभूमीतील स्वाभिमान प्रत्येक क्षणी ते छत्रपती संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. युद्धाच्या प्रसंगात तलवारीचा चमकणारा वार, आणि शत्रूच्या डोळ्यात भीती निर्माण करणारी नजर हे सगळं पाहताना अंगावर शहारा येतो.

सदर चित्रपटात काही प्रसंग इतके प्रभावी आहेत की अश्रू आवरणे अशक्य होऊन जातं हा फक्त सिनेमा नाही तर ही तीव्र अनुभूती आहे. चित्रपट संपल्यानंतरही मनातून बाहेर न पडणारा अनुभव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यामुळे ऐतिहासिक छावा हा चित्रपट शासनाने टॅक्स फ्री करावा कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून ‘यामध्ये अनेक तरुण युवकांना छत्रपती संभाजी महाराजांची आदर्श कारकीर्द बघता येईल त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह चित्रपट बघण्याचे आवाहन करण ससाणे यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.