बोल मोहिनीराज की जयच्या जयघोष करत ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या मुख्यदिवशी सायंकाळी रेवड्याची उधळण अमृतवाहिनी प्रवरानदीच्या तीरावरील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयातील पाच दिवस दर्शनासाठी असलेल्या भगवान श्री मोहिनीराजाची उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत मंदिर प्रांगणात आल्यावर काल्याची दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी मंदिर परिसरात ठिक-ठिकाणी काल्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी पहाटे वडार समाज बांधव यांनी प्रवरासंगम येथून आलेल्या कावडीचे नगर पंचायत चौकामध्ये आल्यानंतर सुवासिनीनी पंचारती ओवाळून स्वागत केले. उत्सवमूर्तीस आणलेल्या गंगाजलाने जलाभिषेक करण्यात आला. नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांच्या हस्ते उत्सवमूर्तीस अभिषेक पूजा करण्यात आली.दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला.

यात्रा काळात ह भ प भास्करगिरी महाराज ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, विठ्ठलराव लंघे, तहसिलदार संजय बिरादार, सुनिलगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक नेवासकर , रमेशानंदगिरी महाराज ,भगवान महाराज जंगले शास्त्री माजी .आ.नरेंद्र पा. घुले, उद्योजक प्रभाकरराव शिंदे, ऋषिकेश शेटे, पांडुरंग अभंग, पै. अनिकेत घुले, पुणे युवासेना जिल्हाप्रमुख यांनी श्री मोहिनीराज मुर्तीचे दर्शन घेतले . सोमवारी सायंकाळी ६ वाजता न्यायालयाच्या इमारतीमध्ये ठेवलेल्या पालखीचे पुजन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही वाय जाधव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच आर वाघमारे,
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश जी बी यादव, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस एन भोसले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी आर सुगावकर (आज उपस्थित नाही कोर्टात), प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस वाय सुळ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए एन सरक
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस व्ही जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

तदनंतर पाकशाळा येथून उत्सवमूर्तीचे मंदिराकडे प्रस्थान झाले.यावेळी टाळमृदुंगाचासह सनई चौघडयाचा निनादात व मोहिनीराज महाराज कि जयचा जयघोष करत हनुमान भजनी मंडळाचे भजनी मंडळ, प्रवरासंगम येथील मुबारक बॅन्डच्या भक्तीगीत वाजत गाजत उत्सव मूर्तीचे कोर्ट गल्ली,देशपांडे गल्ली मार्गावर भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी निखिल जोशी यांचा देवाजी राखोळ आवाज निनादतहोता. श्री मोहिनीराजचा जय जयकार भावीक करत होते. पालखी मार्गावर ठिक-ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. उत्सवमूर्ती मंदिरात गेल्या नंतर मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी पालखीवर भाविकांनी रेवड्यांची उधळण केली. मोहिनीराजांचा जयजयकार काल्याप्रसंगी मंदिर परिसरात जमलेल्या भाविकांच्या गर्दीमधून घुमत होता.
मंदिर परिसरात नागरिकांच्या वतीने काल्याचे वाटप करण्यात आले. शहरातील रस्ते गर्दी फुलून गेले होते.मुख्यपेठेसह रस्त्यांवर मिठाई, सौंदर्यप्रसाधने, मिठाई, गृहपयोगी,खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती . पोलिस प्रशासनाने यात्रा उत्सव काळात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्री मोहिनीराज उत्सव काळात ग्रामस्थ , राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, तरुण मंडळे, शासकीय कर्मचारी संघटना, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महिला मंडळ आदींनी झेंडा मिरवणूक काढून झेंडा मंदिर शिखरावर लावण्यात आले .याही वर्षी उत्सवाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते पाच दिवस अमृत वाटपाचे प्रतिक असलेल्या अन्नदान पंगतीला व दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी चप्पल स्टॅन्ड चे नियोजन कार्तिक कोकणे याने करून सेवा दिली .
औदुंबर चौकात यात्रा कमेटीच्या वतीने खाद्य जत्रेतील स्टाॅलवर वेगवेगळया पदार्थांचा आस्वाद नागरीकांनी सहकुटुंब घेतला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.