पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मोहन विठ्ठल डहारे यांना नुकतेच मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला अहिल्यlनगर यांचे हस्ते सहाय्यक फौजदार पदोन्नती देण्यात आली.
मोहन डहारे हे एक गरीब कुटुंबातील सदस्य असून त्यांनी आपले शालेय शिक्षण गावातील पाचेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे झाले.त्यानंतर पुढील शिक्षण श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेज येथून एम ए इंग्लिश पर्यन्त शिक्षण घेऊन ते सन १९९४ मध्ये पोलीस दलात सेवेत रुजू झाले. आज अखेर त्यांची पोलीस दलात सेवेला ३१ वर्ष पूर्ण झाले.

त्यांनी आपली सेवा शेवगाव येथे ट्रॅफिक डॉग स्कॉड म्हणून तर अहिल्यानगर शेषन कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यांना सहाय्यकफौजदार पदोन्नती सन्मानित करण्यात आल्याबद्दल अहिल्यानगर येथील पोलीस कर्मचारी व पाचेगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.