नेवासा – तालुक्यातील माळी चिंचोरा येथील वारकरी तसेच शेतकरी असलेल्या भाऊसाहेब नारायण गायकवाड ( वय 60 )यांनी अतिशय कठीण व विशेष धार्मिक महत्व असलेली नर्मदा परिक्रमा 103 दिवसात चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालत पूर्ण केली. माळी चिंचोरा गावात गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढून स्वागत केले. गावातून विशेष नर्मदा परिक्रमा करण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष महंत सुनील गिरीजी महाराज यांनी येऊन कौतुक करून त्यांना शुभाशीर्वाद दिले व परिक्रमेचे महत्त्व सांगितले .लहानपणापासून भजन, कीर्तन, पारायण व वारीची आवघड असलेल्या भाऊसाहेब गायकवाड यांनी चारीधाम यात्रा पंढरपूर, आळंदी त्र्यंबकेश्वर व इतर धार्मिक वाऱ्या केल्या आहेत

साधू- महंतांनी दिलेली माहिती व प्रेरणेतून त्यांनी मनाशी चंग बांधून मानसिक व शारीरिक तयारी सुरू केली होती.शेती व घराची सर्वस्वी जबाबदारी पत्नी व मुलाकडे सोपवून नर्मदा परिक्रमेसाठी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर तेथूनच परिक्रमेबाबत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन तब्बल 103 दिवस शेती, जंगली श्वापदे असलेल्या घनदाट जंगल, उंच डोंगर दऱ्याखोऱ्यातून निसर्गरम्य परिसरात चालताना स्वतः शेतकरी असल्याने तेथील शेती पिकांची पाहणी करीत व ‘ नर्मदे हर नर्मदे हर’ चा जयघोष करीत दिवसा नर्मदा परिक्रमा, रात्री आश्रमात झोप घेऊन परिक्रमेच्या मार्गावरील आदरातिथ्याचा आनंद घेतला.जवळ पास साडेतीन महिने आपल्या कुटुंबाला सोडून मोठ्या भक्तिभावाने खडतर समजली जाणारी परिक्रमा पूर्ण करून ते गावी परतले. ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढली. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

त्यांच्या कठोर परिश्रमाच्या भक्तीचे पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.त्याच्या मुलगा सचीन याने आपले कर्तव्य पार पाडले सकाळी गंगा पूजन करून ज्ञानेश्वरी उपासक ह ब प राम महाराज खरवंडीकर यांचे कीर्तन व भजनी मंडळ रथ महाप्रसाद सर्व नियोजन केले त्यांच्या मुलांनी केलेले नियोजन पाहून भाऊसाहेब गायकवाड यांना फार अभिमान वाटला त्यांनी मुलााचे भरभरून कौतुक केले पंचक्रोशीतील भजनी मंडळ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्व नाते गोते पाहुणे मंडळी याचे भाऊसाहेब गायकवाड यांनी आभार मानले व त्यानंतर महाप्रसाद झाला सुमारे 400 ते 500 भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले माझे वय 60 असून फक्त विश्वास डगमगू दिला नाही म्हणून माझी परिक्रमा पूर्ण झाली दुःखही आलं वाट्याला हर हर गंगे म्हणत सर्व अडचणीवर मात केली आपल्यावर जर विश्वास असेल कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी या परिक्रमातून दाखवून दिले आहे .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.