गणेशवाडी – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ताविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण जिल्ह्यातील प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात सर्व सुलभकांनी व शिक्षकांनी आपल्या क्षमता आत्मसात करणे, तसेच क्षमता आधारित अध्ययन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड यांनी केले.

सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल मध्ये सुरू असलेल्या या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण २०२३) (शालेय शिक्षण २०२४), शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना-कार्यनीती, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती, अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती, समग्र प्रगती पुस्तक इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे प्रतिपादन कराड साहेब यांनी केले.यावेळी मुळा एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राध्यापक अशोक तुवर सर यांनी शिक्षक सक्षमीकरण व क्षमता वृद्धी यावर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे साधन व्यक्ती सामी शेख, सुजाता इंटरनॅशनल स्कूलचे संचालक किरण सोनवणे सर, शनेश्वर देवस्थान संस्थांनचे विश्वस्त आप्पासाहेब शेटे, पत्रकार गणेश बेल्हेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव यांनी तर आभार अविनाश निकाळजे यांनी केले. या प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून अविनाश निकाळजे, सुभाष जाधव, कैलास घावटे, अरविंद गायकवाड, तेजस नाईकवाडी, राहुल शिंदे, अमोल बरबडे, देविदास अंगरख, संजय रणमले, संजय कडु, बाळकृष्ण गंधारे,श्रीमती मंजुश्री जाधव, रामराव काळे , विष्णू वारुळे, कंकर वडागळे हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.