नेवासा – रेखा संदीप आदिक वय 30 वर्ष रा. खानापूर, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर या दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी संगम लॉन्स, प्रवरासंगम येथे नातेवाईकांच्या लग्नाकरिता आपले पती व इतर नातेवाईकांसह दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आल्या असता रेखा अदिक या मंगल कार्यालयाकडे नातेवाईकांसह जात असताना एका पल्सर मोटार सायकलवरून दोन अनोळखी ईसमानी येऊन त्यातील मागे बसलेल्या ईसमाने गळ्यातील तीन तोळ्याचा सोन्याचा गंठण जबरदस्तीने ओरबाडून अहिल्यानगरच्या दिशेने पळून गेले. त्यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी पाठलाग देखील केला परंतु चैन स्नॅचर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर रेखा अदिक यांनी तातडीने नेवासा पोलीस स्टेशन गाठले. तेथे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना भेटल्यानंतर कैफियत ऐकून रीतसर फिर्याद घेऊन दोन अनोळखी ईसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात येऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस ठाणे नेवासा यांनी हाती घेतला होता.

चैन स्नॅचींगची माहिती मिळाल्याबरोबर नेवासा पोलिस ठाण्याकडील डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे अमोल साळवे यांनी तातडीने प्रवरासंगम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज युद्धपातळीवर तिन दिवस सलगपणे तपासले असता चैन स्नॅचर हा श्रीरामपूरच्या बाजूने आला आहे असे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी नेवासा ते श्रीरामपूर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींच्या मिळालेल्या छायाचित्रवरून पोलीस ठाणे राहुरी येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार यांनी ओळखून सदरचा सराईत गुन्हेगार अर्जुन गोरडे रा. श्रीरामपूर असल्याचे सांगितले. त्यावरून नेवासा पोलीस ठाण्याकडील डी.बी. पथकाने श्रीरामपूर येथे दोन दिवस सापळा लावला परंतु गुन्हेगारांना कुणकुण लागताच परागंधा झाले होते.

पोलिसांचा पुन्हा कसोशीने शोध चालू असताना श्रीरामपूर येथे लपून बसले असल्याचे खात्रीलायक बातमी मिळाली असता छापा टाकून अर्जुन गोरडे यास सीताफिने पकडले. अर्जुन गोरडे यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सुरुवातीस आपण असे काही केले नाही असा आव आणला परंतु पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच एका साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
अमोल गोरडे यास पोलिसांनी अटक करून मा. न्यायालयाची परवानगी घेऊन ओळख परेड देखील घेतली. सदर ओळख परेडमध्ये फिर्यादीने आरोपीस लागलीच ओळखले. सदरच्या आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर करून तपासकामी तिन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये जबरीने चोरून नेलेली सोन्याची साखळी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री. सुनील पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कल्लूबर्मे व पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी चोखपणे बजावली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.