गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील धनगरवाडी येथे घरफोडी करत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली आहे.दि. १८ रोजी मध्य रात्री १.३० वाजेच्या सुमारास धनगरवाडी शिवारात असलेल्या अभिषेक संतोष देशमुख (वय. १८) यांचे राहत्या घराच्या मागिल बाजूने असलेल्या दरवाजातून तिन चोरट्यांनी मध्ये प्रवेश करत फिर्यादीस हाॅकी स्टिकचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह काही रोख रक्कम असा एकुण एक लाख चौवीस हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी आपल्या फौजफाट्यासह घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली व तपासाकामी सुचना केल्या. दि. १८ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ४२/२०२५ बिएनएस चे कलम ३०९(४) ,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सुरज मेढे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.