सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई संचलित अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
यशवंत कॉलनी तारकपूर अहिल्यानगर यांचे वार्षिक स्नेहसंमेलन माऊली संकुल सभागृहात संपन्न झाले शाळेच्या संचालिका सौ निलांगी विजय गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संमेलनात विद्यार्थ्यांनी उत्साहात विविध कला गुणांचे सादरीकरण केले यास विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गणेश जंगले, दादा चौधरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष येवले तसेच जकीरिया आघाडी स्कूलचे मुख्याध्यापक अन्सार शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुर प्राथमिक स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे हे होते.

उपस्थित मान्यवरांचा सन्मान मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे यांनी केला. सूत्रसंचालन वाघमारे यांनी केले तर आभार अविनाश विधाते यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक ऐतिहासिक तसेच बाल गीतांवर नृत्य सादर केले. दोन छोट्या नाटिका गरबा नृत्य, भांगडा, बंगाली नृत्य सादर करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील विविधता या सादरीकरणातून दाखवण्यात आली.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख, मार्गदर्शक प्रशांत गडाख, उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.