सोनई | संदिप दरंदले – नेवासा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (बाजारतळ) चांदा येथे शिवजयंती सोहळा शिवस्मारकास अभिषेक व पुजन व तद्नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. लंघे म्हणाले आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारून समाजातील शेवटच्या घटकाचे काम करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे याला प्राधान्य देणारे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नेवासाचे तहसीलदार संजय बिराजदार साहेब, सोनई पोलीस स्टेशन निरीक्षक विजय माळी साहेब, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब जावळे, चांदा येथील सरपंच सुनंदाताई दहातोंडे, कौठाचे सरपंच प्रमोद गजभार,उपसरपंच सौ.वर्षाताई सागर जावळे, ग्रामपंचायत सदस्य समस्त शिवभक्त,ग्रामस्थ उपस्थित होते.नेवासा तालुक्यातील सोनई, कुकाणा, भेंडा, चांदा, नेवासा शहर, करजगांव, पानेगाव, वडाळा, घोडेगाव, शिरसगाव आदी गावा मध्ये शिवजयंती सोहळा तरुण मंडळाच्या शिवभक्त प्रेमी कडून उत्सहात साजरा करण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.