नेवासा – नेवासा फाटा येथील शिवगर्जना उत्सव समितीच्या वतीने रक्तदान व अन्नदान करून छत्रपती शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवभक्तांनी पुष्पांजली अर्पण करून रयतेच्या राजाला अभिवादन केले. यावेळी शेकडो शिवप्रेमींनी रक्तदान केले. त्यामुळे शिवजयंती उत्सव आदर्शवत असा ठरला. याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. विठ्ठलराव लंघे पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, मुकींदपूरच्या सरपंच कल्पना निपुंगे, उपसरपंच भारती कर्डक यांनी येथे भेट देऊन जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. रक्तदान व अन्नदान उपक्रमाचे कौतुक केले. शिवगर्जना उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे हे ९ वे वर्ष आहे. अहिल्यानगर येथील जनकल्याण रक्तपेढीला रक्तदान देण्यात आले. रक्तदान यशस्वी होण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीच्या टीमसह शिवगर्जना उत्सव समितीच्या सदस्यांनी प्रयत्न केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.