नेवासा – जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दराने ऐतिहासिक विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने ८९ हजारांचा तर चांदीच्या दराने १ लाखांचा आकडा ओलांडला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर ८९ हजार ३०० रुपये चांदीचे दर १ लाख २ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या ५० दिवसांत सोन्यांच्या दरात तब्बल १-५–हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कर रचना जर लागू झाली तर सोन्याचे भाव ९२ हजार तर चांदीचे दर हे १ लाख १० हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्या-चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.