नेवासा – साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडमच्या भाविकाची पूजा साहित्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचबरोबर पोलिसांनी ज्या दुकानावर भाविकाची फसवणूक झाली त्या दुकानच्या जागा मालकाला सुद्धा आरोपी केले आहे. दुकान चालकाला यापूर्वीच आरोपी करण्यात आले आहे.
भाविकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना प्रथमच पोलीस कोठडी मिळाल्याने भाविकांची पिळवणूक व लुबाडणूक करणारांचे धाबे दणाणले आहेत. मूळचे पंजाबचे असलेले आणि सध्या यूकेमध्ये वास्तव्यास असलेले बलदेव राम यांचे कुटुंब शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते.

दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका एजंटने त्यांना एका दुकानात नेऊन ५०० रुपयांचे पूजा साहित्य ४ हजार रुपयांना विकत घेण्यास भाग पाडले. यानंतर भाविकांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन सदर व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी योगेश मेहेत्रे, अरुण त्रिभुवन, प्रदीप त्रिभुवन आणि सुरज नर्वडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना राहाता न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याशिवाय पोलिसांनी जागा मालक अनिलआढाव यालाही आरोपी केले आहे.पोलीस उपअधीक्षक शिरीषं वमणे व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. पोलिसांच्या ठोस भूमिकेने, भाविकांना लुबाडणारांचे धाबे दणाणले आहेत.. शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे सुद्धा अनधिकृत दुकानावर कारवाई करण्याच्या पावित्र्यात आहेत.
साईभक्तांना लुबाडणूक प्रकरणी आरोर्षीना पोलीस कोठडी मिळाल्याची व दुकान भाड्याने देणाऱ्या जागा मालकालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीय ग्रामस्थ पोलिसांच्या कारवाईचे समर्थन व करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.