नेवासा – रणसिंग क्लासिक या बॉडीबिल्डिंग, मेन्स फिजिक व राहुरी तालुका श्री स्पर्धेचे राहुरी येथे २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. रणसिंग जिमतर्फे आयोजित आणि अहिल्यानगर असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डिंग आणि फिजिक स्पोर्टस् व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने यांच्याशी संलग्न असलेल्या स्पर्धेचे आयोजन राहुरीतील नूतन मराठी शाळा क्र. १ समोर करण्यात आले आहे.
स्पर्धेचे सचिव कैलास रणसिंग आणि अध्यक्ष मयूर दरंदले यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहा वजनगटांसाठी बॉडीबिल्डिंग स्पर्धा घेतली जाणार आहे. यामध्ये ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ७५ किलो वरील (ओपन गट) असे गट असणार आहेत.

रणसिंग क्लासिक या किताबला ११०००, उपविजेता या किताबला ५००० व बेस्ट पोझर या किताबला ३००० रोख पारितोषिक देण्यात येईल व तसेच उर्वरित विजेत्यांना रोख पारितोषिके, पदके, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत, त्यामुळे ही स्पर्धा फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग प्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
याशिवाय, मेन्स फिजिक स्पर्धेत १७० सीएम व १७० सीएम वरील प्रत्येक गटात १ ते ३ क्रमांक काढण्यात येईल. त्यामध्ये सर्टिफिकेट आकर्षक ट्रॉफी आणि मेडल स्पर्धकांना मानांकन मिळणार असून ‘राहुरी तालुका श्री’ ही प्रतिष्ठित स्पर्धा ओपन गट असेल. त्यात १ ते ५ क्रमांक काढण्यात येईल.

जिल्हाभरातील अनेक स्पर्धकांचा सहभाग आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती यामुळे रणसिंग क्लासिक ही स्पर्धा एका सोहळ्यात परिवर्तित होईल आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळेल.
अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धक आणि प्रेक्षकांनी आयोजकांशी संपर्क साधावा. स्पर्धकांचे दुपारी ४ ते सायंकाळ ६ वाजेपर्यंत वजन घेण्यात येईल. व स्पर्धा संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.