सोनई – शनिशिंगणापूर ता नेवासा येथील पानसनाला प्रकल्पातील नव्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकोबाराय यांच्या भक्ती शक्ती शिल्पावर शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व उपाध्यक्ष विकास बानकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, यावेळी अशोक देवा कुलकर्णी यांनी पौराहित्य केले. शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील भाविकांनी छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त अभिवादन केले
व जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या व संत तुकोबारायांच्या मूर्तिपूढे सेल्फी घेऊन आठवणी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या.

याप्रसंगी छत्रपती शिवरायांची आरती संपन्न झाली याप्रसंगी अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरपंच बाळासाहेब बानकर,विश्वस्त प्रा आप्पासाहेब शेटे,विठ्ठल आढाव, कार्यकारी अधिकारी जी के दरंदले,उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे,सचिन बेल्हेकर आदी उपस्थित होते.
शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील शनिभक्तांनी आवर्जून भक्ती,शक्ती शिल्पावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस जयंतीनिमित्त अभिवादन केले व आकर्षक शिल्पाबरोबर फोटो घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाच्या आठवणी जागवल्या..


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.