सोनई – घोडेगाव ता नेवासा येथील छत्रपती इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नर्सरी, एल केजी आणि यु केजी वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, मावळे आणि अन्य ऐतिहासिक पात्रांचे सजीव दर्शन घडवले.
प्रतिमा पूजन आणि जयघोषाने वातावरण शिवमय
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला, सौ.अंजली संजय जाधव यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.

शाळेच्या अध्यक्ष व शिक्षकांची उपस्थिती
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष रवी आळंदीकर , संस्थेच्या संचालिका सविता आळंदीकर, संस्थेचे संचालक किरण जाधव, तसेच प्रतीक्षा शिदोरे आणि पूजा लोंढे या उपस्थित होत्या. त्यांच्यासह विद्यार्थी व पालकांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
छत्रपती इंटरनॅशनल स्कूल – नाविन्यपूर्ण उपक्रमांचा केंद्रबिंदू
घोडेगावात नव्याने सुरू झालेल्या छत्रपती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, त्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही उत्साही असतात.
शिवजयंती निमित्ताने चिमुकल्यांनी दाखवलेला उत्साह, त्यांची वेशभूषा आणि घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या मनात शिवरायांविषयी अभिमान आणि प्रेरणा निर्माण केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.