नेवासा – तहसील कार्यालय मध्ये महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी शेत व शिव( पानंद)रस्त्याच्या प्रश्नासाठी व समस्या सोडवण्यासाठी जनन्याय दिन कार्यक्रम घेतला जात असून गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळ समितीचे वतीने जनन्याय दिन कार्यक्रमात माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री संजय बिरादार,संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार श्री चिंतामणी, नायब तहसीलदार किशोर सानप, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व श्री एस डी कुलकर्णी रोहयो अव्वल कारकून व लिपिक श्री श्रीपत उमाप या अधिकाऱ्यांनी शिव – पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर उपस्थित रस्ता ग्रस्त शेतकऱ्याच्या समस्यावर सविस्तर चर्चा करून शेत रस्ता समस्या निवारणासाठी पुढील कार्यवाहीसाठी प्रत्यक्षात आदेश पारित करीत केले,

त्यामुळे शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीच्या माध्यमातून चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व समन्वयक श्री दादासाहेब जंगले यांचे मार्गदर्शनाने नेवासा तहसील येथे गुरुवार हा जनन्यायदिन पाळण्याचे तहसीलदार श्री संजय बिरादार यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केले होते त्यानुसार महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी जनन्याय दिन घेण्यात येईल असे तहसीलदार यांनी सुचविले होते त्यानुसारशेत रस्ते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले .या जन न्याय दिनास 20 फेब्रुवारी 20 25 रोजी तहसिल कार्यालयातील तहसीलदार संजय बिरादार व रो. ह. यो.अव्वल कारकून श्री कुलकर्णी व उमाप लिपिक यांनी शेत रस्ता प्रकरणे हाताळली . त्यामुळे तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या 40-50- समस्याग्रस्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले .

यावेळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यां तहसिलदारांचे आदेश होऊनही दोन-तीन वर्षा नंतरही अजून रस्ते बंदच आहेत. रस्ते अडविणारे दाद देत नाहीत. दादागिरी व आडमुठेपणा करुन त्रास देतात. शेती पडीत ठेवावी लागत आहे.आमचे उत्पन्न बंद झाल्याने व मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होत असल्याने आता आम्हाला जलद गतीने न्याय न्याय द्यावा अशी ही मागणी केली यावेळी श्री कुशिनाथ दगडू फुलसौंदर करजगाव, येथील यांच्या प्रकरणावर विशेष भर देऊन प्रश्न निकाली काढण्यात आले तसेच नजीक चिंचोली येथील मिनीनाथ घाडगे रस्त्याबद्दल योग्य तो निर्णय झाल्या नसल्याने पुन्हा त्यावर कार्यवाही करण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या अशी माहिती नायब तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे यांनी सांगितले. भूमि अभिलेख उपधीक्षक गोसावी साहेब यांनी त्यांचे कार्यालयातील भूकर मापकांनी काही शिव रस्त्यांच्या मोजण्या केल्या त्याबद्दल चळवळीचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. काही शिवरस्त्यांच्या हद्दीच्या खुणा दाखवणे बाकी आहे ते लवकरात करतो असे आश्वासन त्यांनी दिले

श्री संदीप गोसावी उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख नेवासा यांनी नेवासा तालुक्यातील 34 शिव रस्त्यांचे मोजणीचे कार्यक्रम ऑक्टोबर 2025 पर्यंत तयार केला व तसे आदेशही काढले व त्यातील चार ते पाच शिव रस्त्यांची मोजणी ही केली आता हद्दीच्या खुणा दाखविण्यासाठी तारखा निश्चित करीत आहेत असे त्यांनी सांगितले निंभारी अमळनेर शिवरस्ता मोजणी आजच झाली
.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांनी शेत रस्ता व शिव रस्ता समस्या सोडविण्यासाठी चा जनन्याय दिनाचा बोर्ड- फलक तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांच्या परवानगीने लावल्यानंतर शेत व शिव रस्त्यांचे समस्या, समस्याग्रस्तांचे प्रकरण वाचून विवेचन केले व युक्तिवादही केला शेत रस्त्यांच्या समस्या त्वरित निकाली काढा, महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करावी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाची ही अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.
तहसीलदारांनी तहसील कार्यालयात पुन्हा फलक जन न्याय दिनाचे गुरुवारी लावण्याची मान्य केले पुढील जनन्याय दिनाचे वेळी मागील कामाची प्रकरणाची कार्यवाही केल्याचा आढावा घेण्यात यावा तसेच शेत रस्ता ग्राम समिती प्रत्येक गावामध्ये स्थापन झालेली नाही त्या संदर्भात पुन्हा स्मरणपत्रे देऊन तलाठी व ग्रामसेवक यांनी शेत रस्ता स्थापन लवकर कराव्यात व त्याचा अहवाल घेण्यात यावा असे सुचविले गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांनी शेत रस्ता समित्या स्थापनेबाबत जीआरच्या तरतुदीनुसार तहसीलदारांचे आदेश राबविण्यात असमर्थता दाखविली असताना तहसीलदारांनी गट विकास अधिकारी यांना फोन करून व गट विकास अधिकारी यांच्याकडून गाव रस्ते समिती स्थापन करून घेतो असे आश्वासन दिले व जलद गतीने शेत रस्ता समस्या सोडविण्यात याव्यात असे सुचविले

नेवासा हा झिरो पेंडिंग केसेस झाल्या पाहिजेत असा प्रयत्न करण्यात यावा श्री नाथाभाऊ शिंदे यांनी सुचविले
यावेळी तालुक्यातील शिव – पाणंद रस्ता चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे श्री सागर सोनटक्के सर, ,शिवाजी काळे,राजू गरड, मुरलीधर जरे, रमेश भक्त,, कुशिनाथ फुलसौंदर , अविनाश मेहर बाबा,बाळू थोरात , ,विठ्ठल करमड , मिनिनाथ घाडगे , हाफिज खान पठाण सगाजी आयनर, बबन शिंदे, संतोष शिंदे,सोमनाथ शिंदे ,संभाजी पवार .गणेश बोचरे त्यांचे गावकरी आदिंसह सुमारे ४० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. आता येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 6 मार्च2025 रोजी तहसील कार्यालयात जनन्यायाधीन असून शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे व इतर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.