नेवासा – माजी प्राचार्य रघुनाथ आगळे हे शिरसगावचे भूषण असून त्यांनी शाळेसाठी अनमोल किमतीची जागा दान करून दिनदलीत ,गोरगरिबांची सेवा करण्याची संधी घेतली असल्याचे मत आमदार विठ्ठल लंघे पाटील यांनी व्यक्त केले
नेवासा फाटा येथे तालुका विद्या प्रसारक मंडळ आयोजित कार्यक्रमात आमदार लंघे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लव शंकराव शिंदे होते. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य रघुनाथ किसन आगळे विद्यामंदिर या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शाळेला भरीव मदत करणारे प्राचार्य रघुनाथ आगळे ,सौ कौशल्यताई आगळे ,प्राचार्य लक्ष्मणराव मतकर ,पंचगंगा उद्योगसमूहाचे प्रभाकरराव शिंदे पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून सत्कार करण्यात आला याप्रसंगी मोनिका आगळे,माजी अध्यक्ष कृष्णा डहाळे ,संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण खंडाळे ,प्राचार्य लक्ष्मण मतकर ज्येष्ठ विचारवंत रवींद्र मुळे ,प्रभाकरराव शिंदे पाटील यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य आगळे म्हणाले की माझ्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये कै वकिल आण्णा लंघे पाटील ,स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांचे मोठे योगदान आहे स्वकष्टातून घेतलेली काही जमीन शैक्षणिक कार्यास देताना आनंद झाला असून या परिसरात शैक्षणिक हब निर्माण होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की माजी प्राचार्य रघुनाथ आगळे हे शिरसगावचे भूषण असून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सरांनी अनमोल किमतीची जागा शाळेसाठी दान करून दिनदलीत ,गोरगरिबांची सेवा करण्याची संधी घेतली आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून या शिक्षण संस्थेच्या पाठीशी कायम उभा राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात लव शिंदे म्हणाले की नेवासा गावाला जागेमुळे मर्यादा असल्या तरी प्राचार्य आगळे यांच्या इच्छेप्रमाणे या परिसरात शैक्षणिक हब निर्माण व्हावे ही त्यांची इच्छा असून केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शैक्षणिक कोर्सेसचा लाभ या परिसराला साठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महेश मापरी यांनी आभार मानले तर ज्ञानेश्वर काळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सरपंच सतीश निपुंगे पाटील, गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड,सूर्यकांत शेठ गांधी ,रामभाऊ खंडाळे ,शंकरराव नळकांडे ,अभय गुगळे ,सागर गांधी ,प्रताप चिंधे, माऊली पेचे ,भाऊसाहेब वाघ पाटील,निरंजन डहाळे ,अनिल गीते,नितीन खंडाळे ,एड संजीव शिंदे ,अरविंद मापारी ,विवेक नळकांडे संस्थेचे संचालक ,मुख्याध्यापक जनार्दन शेंडे,शिक्षक, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.