सोनई –नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात शिवमहापुराण कथेस उत्साहात सुरुवात झाली. गुरुवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धर्मध्वजाची स्थापना ह. भ. प. सुनीलगिरीजी महाराज, साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली, भाजपा नेते सचिन देसरडा, ह. भ. प. ज्ञानदेव महाराज कोरडे, बाळासाहेब सोनवणे आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली.
यानंतर सायंकाळी ७ वाजता शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. नाथ संप्रदायाच्या साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली टाकराळा ता-हिमायतनगर जि-नांदेड यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा रंगत आहे. ही कथा गुरुवार, दि. २० फेब्रुवारी ते मंगळवार, दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.

महाशिवरात्री निमित्त भव्य मिरवणूक आणि विशेष कार्यक्रम
बुधवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी उपासकांसाठी फराळ वाटप, तसेच दुपारी ३ वाजता श्री महादेवाची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह. भ. प. डॉ. मोहनिताई पाबळे यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन होईल.
गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ह. भ. प. अविनाश महाराज भारती यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद आणि कार्यक्रमाची सांगता होईल.
मागील वर्षीही साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली यांच्या सुमधुर वाणीने शिवमहापुराण कथा संपन्न झाली होती. त्यांना मानणाऱ्या भक्तगणांची मोठी संख्या या भागात आहे. यंदाही कथेस होणारी गर्दी त्याच श्रद्धेचे द्योतक आहे.
कार्यक्रम स्थळी भव्य स्टेज उभारण्यात आले असून, स्टेजवरील भगवान महादेवाची मनमोहक मूर्ती आणि आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन
२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कथा संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. हजारो महिला आणि भाविक भक्त या वेळी उपस्थित राहतात.
सर्व भक्तगणांनी या पवित्र कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यम मित्र मंडळ, घृष्णेश्वर महादेव मंदिर सेवा समिती आणि समर्थ ग्रामस्थ घोडेगाव यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.