नेवासा – आज शनिवार दिनांक २२-२-२०२५ रोजी ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पैस खांब मंदिर, ज्ञानेश्वरी रचना स्थान (संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान) नेवासा येथे ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे वाचन केले. याप्रसंगी मा. श्री.शिवाजीराव कराड साहेब(गटशिक्षणाधिकारी-पंचायत समिती नेवासा), ह.भ.प. वेदांतचार्य देविदासजी महाराज म्हस्के, ज्ञानोदयचे प्राचार्य श्री. रावसाहेब चौधरी, ह.भ.प. सचिन महाराज पवार, मराठी विषयाचे अध्यापक श्री. काकासाहेब काळे, श्री. संदीप ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संजय आखाडे यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे वाचन केले. याप्रसंगी ह. भ. प. देविदास जी महाराज म्हस्के यांनी अभिजात मराठी भाषेचे महत्व ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना समजून सांगितले.मा. गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब यांनी मराठी भाषा पंधरवाडा उत्साहाने राबवत असताना विविध साहित्यिकांची पुस्तके वाचून त्यातील आशय समजून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच भाषेच्या दृष्टीने नेवासा ही अत्यंत महत्त्वाची भूमी असल्याबाबत सांगितले. प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’असा मौलिक सल्ला दिला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तेथे जाऊन प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विषयाचे शिक्षक श्री.काकासाहेब काळे, श्री. संदीप ढेरे, श्री.अनिल भणगे, श्री. जयराम कोकतरे, यांनी परिश्रम घेतले. श्री.संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.