नेवासा – आमचे आजोबा कै. बाळासाहेब नळकांडे व अन्य जेष्ठ स्वयंसेवक संचालकांनी तालुका विद्या प्रसारक मंडळाचे रोपटे अथक परिश्रमातून वाढवले असून सध्या आयत्या पिठावर रेघोट्याओढणाऱ्या संस्थेच्या काही कारभाऱ्यांनी एकीकडे स्वतःला राम भक्त म्हणत मनमानी कारभार करून मुकुंदपूर येथील शाळेचे जय श्रीराम नाव बदलून देणगीदाराचे नाव देण्याचा घाट घातला आहे याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना जय श्रीराम नावाला संस्थेने धक्का बसवल्यास जय श्रीराम नाव बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा समितीचे निमंत्रक श्रीकांत नळकांडे यांनी दिला आहे.

याबाबत नळकांडे यांनी म्हटले की एकीकडे काहीजण स्वतःला रामभक्त म्हणून घेतात दुसरीकडे मात्र रामाच्या नावाचा तिरस्कार करतात पडद्याआडून रामाचे नाव काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेबनम फेम चुलबुल पांड्यांचा आपण निषेध करत असून मुकुंदपूर येथील शाळेचे जय श्रीराम नाव बदलून अन्य नाव दिल्यास कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीचे निमंत्रक श्रीकांत यांनी दिला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.