नेवासा – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत १९ वा हप्ता हस्तांतरण कार्यक्रमाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील साहेब यांचे शुभ हस्ते सेंट्रल सेक्टर स्कीमचा लाभ घेणाऱ्या व शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्याचा गौरव तसेच केव्हीके मार्फत २४ ते २६ फेबुवारी या कालावधीत आयोजित कृषि प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याअंतर्गत १९ व्या हप्त्याचे थेट शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरण माननीय प्रंतप्रधान मोदी यांचे हस्ते भागलपूर, बिहार येथून करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यानी लाभ घेण्याच्या आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खताचा पुरवठा सुरळीत होत असून पीएम पीक विमा योजना, पशुपालन विषयक योजना, लखपती दिदी, रेशीम उद्योग विकास, कडधान्य व गळीत धान्य याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी विविध योजनांचा उल्लेख माननीय पंतप्रधान यांनी केला. यावेळी देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने (अहमदनगर २) येथून चालू असतांना मंचावर मा. आ. पांडुरंग अभंग, तंत्र अधिकारी श्रीरामपूर अमोल काळे, तालुका कृषि अधिकारी शेवगाव अंकुश टकले, तालुका कृषि अधिकारी पाथर्डी महादेव लोंढे, तालुका कृषि अधिकारी नेवासा धनंजय हिरवे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात विविध शासकीय योजना चा लाभ घेऊन शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सतीश राजेभोसले, नवनाथ धस, सुरेश ढवान, किशोर मिसाळ, आकाश गुंदेचा, आप्पासाहेब फटांगडे, शंकर जाधव, अजय आहेर, उदय पवार, संदीप आगळे, विश्वास कर्डिले या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक केव्हीके चे प्रभारी प्रमुख माणिक लाखे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त अशोक मिसाळ, शिवाजीराव कोलते, सचिव रवींद्र मोटे, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब मरकड, मंडल कृषि अधिकारी गणेश वाघ, शितल नागवडे, प्रशांत टेकाळे, तात्यासाहेब दिवटे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा शेवगाव निलेश भागवत तसेच केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी व कार्यक्षेत्रामधील २७० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. राहुल एस. पाटील तर आभार सचिन बडधे यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.