नेवासा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान येथे पंचदिनात्मक महाशिवरात्री उत्सवाला देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज यांच्याहस्ते धर्म ध्वजारोहण करून रविवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी ‘हर हर महादेव’, ‘त्रिवेणीश्वर भगवान की जय ‘अशा जयघोषाने त्रिवेणीश्वरचा परिसर दुमदुमला होता.
रविवारी सकाळी झालेल्या धर्म ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शोभायात्रा मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज, शिनाई देवस्थानचे महंत श्री आवेराज महाराज, हभप रामनाथ महाराज पवार यांच्यासह हजारो भाविक निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

अग्रभागी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे मिलिटरी बँड पथक, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या मुलींचे लेझीम पथक, पारंपारीक वेशभूषेतील मुलांचे झेंडापथक, डोक्यावर तुळशी कळस घेतलेल्या बालिका हे शोभायात्राचे आकर्षण ठरले होते.
स्वामी रमेशानंदगिरी महाराज यांनी उपस्थित संत महंतांचे संतपूजन केले. यावेळी वेदमंत्राच्या जयघोषात हर हर महादेव, ‘त्रिवेणीश्वर भगवान की जय’ असा जयघोष करण्यात येऊन स्वामी श्री प्रकाशानंदगिरी बाबांच्या हस्ते धर्म ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य चांदगाव येथील प्रकाशगुरू मुळे व भानसहिवरा येथील राजूगुरू जोशी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी हंडीनिमगावचे सरपंच भिवाजी आघाव, अण्णासाहेब जावळे, आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच कल्याण उभेदळ, केशर उद्योग समूहाचे सुरेश उभेदळ, त्रिमूर्ती पब्लिक स्कुलचे प्राचार्य सचिन कर्डीले, विठ्ठल पाषाण, अरुण देऊळगावकर, मनु जाधव, गोरख गुंजाळ, बन्सी आगळे, दशरथ मुंगसे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.