नेवासा – पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यातील सचिन ईश्वर भोसले (वय २५ रा. बेलगाव, ता. कर्जत) याला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख ५० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास – संतोष भगवान खेडकर (वय ४२, रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) यांच्या घरी अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून त्यांच्या आजीला चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या नाकातील सोन्याची नथ हिसकावून नेली.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रवींद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, किशोर शिरसाठ, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. हा गुन्हा सचिन ईश्वर भोसले आणि अल्पवयीन मुलाने केला असल्याचे कळताच पथकाने बेलगाव येथे धाड टाकून सचिन भोसले आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सचिन भोसले याने चौकशीत सांगितले की, त्याने आणि अल्पवयीन मुलाने पाथर्डी तालुक्यातील सांगवी…. करोडी आणि मालेवाडी येथे जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. तसेच, त्याने आणखी दोन पसार संशयित आरोपी पैऱ्या उर्फ पैरेदार उमरका भोसले आणि गाड्या उर्फ गाडेकर झारक्या चव्हाण (दोघेही रा. नवीं नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या मदतीने नेवासा तालुक्यात सौंदाळा व हांडीनिमगाव येथे गुन्हे केले असल्याची कबूली दिली. नेवासा पोलीस ठाण्यातील दोन व पाथर्डी पोलीस ठाण्यातील तीन असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.