नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागील बाजूस चिंचबन रस्त्यावर दांडाईत मळ्यात बांधण्यात येणाऱ्या नियोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराचे सोमवारी एकादशीच्या मुहूर्तावर संत महंतांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या सोहळयाला आमदार विठ्ठलराव लंघे यांची विशेष उपस्थिती होती.संत सावता महाराजांच्या मंदिर निर्माण कार्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन उपस्थित संत महंतांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी देवगड दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के,श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज,मध्यमेश्वर मंदिराचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,स्वामी विवेकानंद आश्रमाचे प्रमुख ब्रम्हचारी श्री ज्ञानेश्वरजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पाडुरंग अभंग यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहणाद्वारे श्रीफळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले.

उपस्थित संत मंडळींचे संयोजन समितीच्या वतीने संतपूजन व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. संत सावता महाराज मंदिर निर्माण समितीचे हभप गणेश महाराज गायकवाड यांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत केले तर मार्गदर्शक हभप दत्तात्रय महाराज व्यवहारे यांनी मंदिर कार्यासाठी भाऊसाहेब दांडाईत यांनी सर्व प्रथम पाच गुंठे जमीन दान केल्याने मंदिर निर्माण निर्णय सर्वांनी मिळून घेतला असल्याचे सांगून मंदिर निर्माणासाठी तन,मन,धनाने सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले.
यावेळी बोलतांना देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की संत शिरोमणी सावता महाराज हे जेष्ठ संत होते.कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी या भक्तीद्वारे त्यांनी कर्मात देव पहाण्याचा संदेश दिला,भक्तीचा मळा फुलवला माऊलींच्या भूमीत त्यांचे होणारे मंदिर वैभवात भर घालणारे ठरेल त्यासाठी सर्वांनी योगदान द्या असे आवाहन केले.

वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के म्हणाले की माऊलींच्या या भूमीत अनेक संतांची मंदिरे निर्माण होत त्यानिमित्ताने सर्व संत एकत्रित येत असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला.कर्माच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती संतांनी केली त्यांचे कार्य आत्मसात करून आपले कर्म म्हणून संतांची पूजा करत रहाण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी प्रेम व भक्ती निर्माण करण्यासाठी मंदिरे ही उदयास आली असून भक्ती व निष्काम प्रेम मिळावे म्हणून मंदिरे आहे कर्माचा दोष घालवायचा असेल तर तनाने मनाने धर्म कार्यासाठी दान करा असे आवाहन त्यांनी केले.तर पांडुरंग अभंग यांनी माऊलींच्या भूमीत होणाऱ्या संत सावता महाराजांच्या मंदिरासाठी स्वच्छ मनाने हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भेट दिली यावेळी मंदिराच्या निर्माणासाठी आपण ही निश्चित मदतीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

यावेळी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी चक्रधर स्वामी मठाचे शाममुनीजी महाराज,बालब्रम्हचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी,गणेश महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर माऊली शिंदे,नारायण महाराज नजन,सचिन महाराज पवार,विठ्ठल महाराज नाईक, रोहिदास महाराज सुसे,ईश्वर महाराज मते,किरण महाराज डिवरे,रामभाऊ जगताप,रामचंद्र खंडाळे,संभाजी पवार, अँड. काकासाहेब गायके,माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, इंजिनीयर सुनील वाघ,करणसिंह घुले,सुभाष कडू पाटील महेश मापारी, दत्तात्रय गायकवाड,राजेंद्र मापारी,मनोज पारखे,नितीन जगताप यांच्यासह संत सावता महाराज भक्त मंडळाचे युवा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर हभप दत्तात्रय महाराज व्यवहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शाबुदाना खिचडीचे प्रसाद रुपाने वाटप करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.