नेवासा – नेवासा वकील संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी तसेच सचिव आणि सहसचिव या पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी ॲड .वैभव निकम व ॲड .अजय रिंधे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाल्याने दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली, त्यामुळे जेष्ठतेनुसार ॲड .वैभव निकम यांना सहा महिन्यासाठी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष म्हणून पदभार सोपवण्यात आला,तर पुढील सहा महिन्यासाठी अजय रिंथे यांना अध्यक्षपद देण्याचे ठरले. उपाध्यक्ष पदासाठी नेवासा न्यायालयाचे कर्तबगार वकील ॲड .सुदाम ठुबे यांची मताधिक्याने निवड करण्यात आली.

सहसचिव पदी ॲड .नीरज नांगरे यांची निवड झाली, याप्रसंगी निवडून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव यांचा सन्मान मुकिंदपुरचे पोलीस पाटील आदेश साठे , संजय सुखदान , सरपंच सतीश निपुंगे ,नेवासा न्यायालयातील जेष्ठ वकील मंडळी यांनी केला. निवडून आलेल्या सर्व मान्यवरांना मराठा सुकानू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश झगरे यांनी शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.