नेवासा – तालुका वकील संघाची 2025-2026 निवडणुक सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी पार पडली या निवडणुकीत सहसचिव पदासाठी अँड.निरज विलास नांगरे यांची निवड झाली असुन सदर निवडणूकीत अँड.निरज नांगरे विरुद्ध अँड.ज्ञानेश्वर धिर्डे यांच्यात मतदान होऊन अँड.निरज नांगरे हे विजयी झाले विजयानंतर सर्व वकील वर्गात आनंदाचे वातावरण दिसुन आले त्यावेळी श्री.नांगरे यांनी बोलताना सांगितले की ही निवडणूक आम्ही कामाच्या जोरावर तसेच सर्व ज्येष्ठ विधिज्ञ मार्गदर्शक व सर्व सर्वच ज्युनिअर सहकारी मित्र यांच्या सहकार्यानेच या निवडणुकीत यश मिळाले.

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अँड गणेश निकम,अँड बन्सी सातपुते,अँड वैभव वाकचौरे, अँड.शेखर गोर्डे, अँड संजय सुखदान,अँड अभिजीत काळे,अँड प्रविण भासार,अँड अनिकेत मापारी आदींसह अनेक मान्यवरांनी नांगरे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या,या निवडणुकीत निवडणुक अधिकारी म्हणून अँड.विजय चंगेडिया व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड.भारत चव्हाण यांनी काम पाहिले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.