नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र सुरेगाव गंगा हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे येथे हजारो वर्षांपूर्वीचे सिद्धेश्वर महादेवाची प्राचीन पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिरात श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला धार्मिक उत्सव कार्यक्रम घेतले जातात. याही वर्षी दरवर्षाच्या परंपरेनुसार बुधवार दिनांक दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी शिवलीलामृत पारायण वाचनाचा सामूहिक पारायण सोहळा सुरू असून दरम्यान काळामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत
श्री सिद्धेश्वर मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली जाते व भजन पूजन संध्या केली जाते. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून भाविक भक्तांच्या अशा आकांक्षा पूर्ण करणारे आहे.

या मंदिराचा जीर्णोद्धार समस्त गावकरी व भावीक भक्तांनी नुकताच केलेला असून रंगरंगोटी केली आहे. माननीय माजी मंत्री नामदार श्री शंकररावजी गडाख साहेब यांनी मंदिरासाठी सभा मंडप उपलब्ध करून दिला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी फराळाचे वाटप अन्नदाते श्री सोमनाथ विश्वनाथ शिंदे हे करत असतात. रात्री 9 ते 11 किर्तन ह भ प श्री नवनाथ आगळे महाराज यांचे किर्तन होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी दि 27,2. 2025 रोजी सकाळी काल्याचे किर्तन ह भ प श्री गणेश महाराज दिघे राणा गणेशवाडी यांचे कीर्तन होणार आहे.तालुक्यातील व परिसरातील भावीक भक्तांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात येऊन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे ग्रामस्थ तर्फे आवाहन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.